सप्ताह

अखंड हरीनाम सप्ताह

सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी सुरु केलेला अखंड हरिनाम साप्ताह आजही १६९ वर्षे पूर्ण होऊन अखंडितपणे प्रत्येक वर्षी श्रावण शुद्ध ५ (पंचमीला) प्रारंभ होतो आणि द्वादशीला समाप्ती होते. गंगागिरी महाराज समाधिस्त झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी सद्गुरू ब्रम्हलीन नाथगिरी महाराज, सद्गुरू ब्रम्हलीन हरीगिरी महाराज,सद्गुरू ब्रम्हलीन सोमेश्वरगिरी महाराज यांनी बेटाची आणि अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा पुढे चालविली

त्यांच्या नंतर पुढे गुरुवर्य सद्गुरू ब्रम्हलीन नारायणगिरीजी महाराज यांनी सप्ताहाचे भव्य दिव्य व्याप्ती/स्वरूप वाढविले. त्यांच्या अधिपत्त्याखाली जास्त सप्ताह पार पडले.

सद्गुरू ब्रम्हलीन नारायणगिरीजी महाराज १९ मार्च २००९  ला समाधिस्त झाले. तेव्हापासून महंत गुरुवर्य रामागीरीजी महाराज मठाधिपती झाले आणि त्यांनी अवघ्या नऊ वर्षात सप्ताहाची भव्य दिव्यता खूपच वाढविली.  

10 ते 15  लाख भाविक. 350 ते 400 एकर जमिनीचा परिसर, भाविकांचा प्रचंड उत्साह, परिपूर्ण भक्तीरस,  समाधान, गावा गावातील लोकांचा सक्रिय सहभाग आणि विशेष म्हणजे तोही कुणालाही आमंत्रण न देता,  अखंड सातही दिवस अमर्याद महाभोजन आणि एकच नाव 'अखंड हरिनाम सप्ताह'.  

असं काय कारण आहे जेणेकरून इतका मोठा जनसमुदाय..या सोहळ्याला उपस्थीत राहतो..प्रत्येक कुटूंब दररोज शक्य तितकं अन्नदान करतं..काय आहे या प्रचंड सोहळ्यामागच्या जनप्रतिसादाचे कारण..? काय आहे या सप्ताहात..? एक वेळेस येऊन बघा सर्व प्रश्नांचे उत्तर आपोआप मिळेल.

 

मठाधिपती गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज सप्ताहात